अनुक्रमणिका

कविता Email ने मिळवा व वाचा (पूर्ण)

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सध्या email ने कविता वाचणा-या वाचकांची संख्या


आगामी कवितासंग्रहातून...

नाही, नाही पुन्हा जायचं, असंच
हुरहुर हृदयाची
नको पुन्हा करुन देऊस जाणीव
वाट पाहत्या मनाची

नको, नको अशी दिसू नकोस
‘तेंह्वा शेवटची’
नको पुन्हा होऊस अशी
हृदयचित्रांची

दिसत जा... रोज रोज
येताना, जाताना
तू ग तुझीच राहून
माझीही होताना

नको, नको पुन्हा दिसू नकोस
शोधत्या श्वासाची
नको पुन्हा होऊस, अशी या
हळव्या मनाची

हसत जा, लाजत जा... रोज
काही बोलत जा
उद्या येणार आहेस म्हणून
अशीच तू पहात जा

नाही, नाही पुन्हा लाजायचं
कोमल पावसाची
नको पुन्हा पाहूस अशी
अथांग नेत्रांची

रोहन जगताप

0 comments:

Copyright © 2008 - मनात राहिलं मन एक!!! - is proudly powered by Blogger
Blogger Template