अनुक्रमणिका

कविता Email ने मिळवा व वाचा (पूर्ण)

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सध्या email ने कविता वाचणा-या वाचकांची संख्या

मूर्ख मन

मी आणि माझं एक मूर्ख मन

दोघेच आहोत इथं, एकांत कट्यावर
तासंतास तुझा विचार करत
इथल्या काळोखातून, सर्वदूर ता-यांमध्ये

कुठेतरी असशील तू
आणि काहीतरी करत असशील
तुझ्याच कल्पनाविश्वात रमून
जिथे अनंत प्रकाशवर्षांपर्यंत
मी कुठेच नाही

पण माझ्या कल्पनाविश्वाचे प्रतिबिंब
उमटले आहे या समोरील ख-या आवकाशात
जिथे या क्षणी तूच तू एक आहेस

तो सुदूर तारा किती जवळ माझ्या!!!
आणि माझे घर दूर दूरऽऽऽ


रोहन जगताप

0 comments:

Copyright © 2008 - मनात राहिलं मन एक!!! - is proudly powered by Blogger
Blogger Template