अनुक्रमणिका

कविता Email ने मिळवा व वाचा (पूर्ण)

Enter your email address:

Delivered by FeedBurner

सध्या email ने कविता वाचणा-या वाचकांची संख्या

आज

आज रहायचं आहे असं
जसं उद्या जायचं नाही कुठं
तुझ्याबरोबर माझ्यासाठी

आज झोपायचं आहे असं
जसं उद्या ना! नाही उठायचं
स्वप्नांमध्येच पाहण्यासाठी

आज क्षणाला पकडायचंय असं
समजून ते शक्य आहे तसं
पुन्हा पुन्हा तो जगण्यासाठी

आज आवरायचं आहे असं
जसं उद्या नाही परतायचं
तुझा-माझा पसारा पाहण्यासाठी

रोहन जगताप

2 comments:

netra said...

manapasun avadali hi kavita....
surekha...

रोहन जगताप said...

Thank You :-)

Copyright © 2008 - मनात राहिलं मन एक!!! - is proudly powered by Blogger
Blogger Template